दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । बारामती । महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत तसेच व्यतिमहव विकास, आरोग्य विषयक मेळावे, व्याख्यानमाला , गरजू महिलांना मार्गदर्शन आदी माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मानवबंध फौंडेशन कटिबद्ध असल्याचे अध्यक्षा सुषमा चव्हाण यांनी प्रतिपादन केले.
मानवबंध फौंडेशन च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील डॉ रमेश सपकळ व इतर मान्यवर उपस्तीत होते.
ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना कपडे वाटप व महिलांना साड्या वाटप त्यांच्या शिक्षणासाठी विविध सामाजिक संस्थांची व साखर कारखान्याची मदत घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, त्याच प्रमाणे बेरोजगार युवकांनी नोकरी च्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या साठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन देण्यात येईल व कर्ज मिळवून देण्यासाठी बँके कडे पाठ पुरावा केला जाईल असेही सुषमा चव्हाण यांनी सांगितले .
संस्थेच्या कार्याचा आढावा सदाशिव पाटील यांनी घेतला तर आभार डॉ सपकळ यांनी मानले .