
स्थैर्य, सातारा, दि. 26 सप्टेंबर : मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळ्याच्या सातारा उपकेंद्रातर्फे येत्या रविवारी (ता. 28) आरोग्यप्राप्ती रोगमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ही कार्यशाळा होईल. आजाराच्या निर्मितीत मनाचा सहभाग, मानसिक ताणतणावावर उपाय, रेसिप्रोपॅथीने रोगमुक्ती, दुःखमुक्ती, आजाराबरोबर निर्माण होणारे अन्य प्रश्न आदी मुद्द्यांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल. तरुण, प्रौढ, ज्येष्ठ अशांसाठी ही कार्यशाळा असून, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी रवींद्र चक्के 9881104910, नंदिनी घोरपडे 9822077227, डी. एल. शिंदे 9970526149, पद्माकर पाठकजी 8888801443 या क्रमांकावर संपर्क साधावा.