४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. 7 जानेवारी २०२५ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणतर्फे आयोजित केलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ मधील चर्चासत्रामध्ये खर्च कमी करून उत्पन्नाचा स्रोत वाढवणे या धरतीवर आधारित पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवस्थापन या विषयावर बोलताना शेतकर्यांनी एकात्मिक पशुधन व्यवस्थापनाचा वापर कसा करावा तसेच मुक्त संचार गोठा पद्धत, जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करावे, आजार कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केल्यास पशुधन व्यवस्थापनामध्ये जास्त फायदेशीर ठरते. जनावरांचे आरोग्य नियंत्रण तसेच गोविंद दूध डेअरीमार्फत पशुधन वाढवण्यासाठी विविध योजनांचा वापर करून महिला सक्षमीकरण, मुरघास निर्मिती प्रकल्प, चारा प्रकल्प, शेणखताचा वापर तसेच शेणखत निर्मिती प्रकल्प, याविषयी उपस्थित शेतकर्यांना पशुधन व दुग्ध व्यवसायाविषयी बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.
व्यवसायामध्ये विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती व विक्री करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, याचीही माहिती उपस्थितांना दिली. चर्चासत्रातील दुसर्या भागामध्ये सौ. सुनीता सावंत मॅडम, कृषी विभाग, फलटण यांनी फूड प्रोसेसिंगअंतर्गत राबविण्यात येणार्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकर्यांना विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रशिक्षण, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच योजनेअंतर्गत मिळणार्या पायाभूत सुविधा, सूक्ष्म अन्नप्रक्रिया व्यवसायामध्ये तयार होणार्या पदार्थांची विक्री, सामूहिक गटशेती या विषयावर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे व्हा. चेअरमन श्री. शरदराव रणवरे होते. श्री. आर. एच. पवार सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होता.
यावेळी श्री. गोविंद नामदेव शेळके नारळ पीक उत्पादक, गाव पाडेगाव, श्री. सचिन विलास गावडे, ढोबळी मिरची उत्पादक गाव कुरवली बुद्रुक, मा. श्री. महेश देवराव धुमाळ डाळिंब उत्पादक धुमाळवाडी, मा. श्री समीर परमेश्वर बोंद्रे केळी उत्पादक मुरूम या प्रगतशील शेतकर्यांचा प्रशास्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर या विद्यार्थिनीने केले.