साहित्याचा केंद्रबिंदू माणूसच : सर्जेराव पद्माकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आणि नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य आणि मानवी समाज या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी साहित्य आणि मानवी समाज यांचे विविधांगी धागे उलगडून दाखविले. सांस्कृतिक बदल सामाजिक बदल आणि मानवाची प्रगती यांचे आंतरिक नाते गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट केले. साहित्य आणि मानव यांचा सहसंबंध जोडणारी अनेक उदाहरणे देऊन माणसांचे माणसांच्या जगण्यातून साहित्य कसे निर्माण होते. हे सुंदर रीतीने दाखवून दिले. साहित्यातून कसे प्रबोधन होते हे जोगवा, नटरंग, नटसम्राट या कलाकृती तील आशायामध्ये दडलेला गर्भार्थ समजून सांगितला. नारायण सुर्वे, अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम, सुरेखा भगत, संध्या रंगारी यांच्या साहित्यातून साहित्याचा केंद्रबिंदू माणूस असल्याचे सर्जेराव पद्माकर यांनी नमूद केले.

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नामदेवराव सूर्यवंशी – बेडके महाविद्यालय येथे दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.आर.राऊत यांनी अन्न, पाणी, निवारा या गरजे शिवाय माणसाला साहित्याची आवश्यकता आहे. हे नमूद केले  कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतेज दणाणे यांनी केले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश दुकळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता कोळेकर यांनी केले. आभार प्रा. आरती शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमा वेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील अनेक लोकांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!