दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | फलटण |
धुळदेव (२३ फाटा, ता. फलटण) येथे माझ्या टेम्पोला दगड मारून शिवीगाळ करत पत्नी सुवर्णा अर्जुन ननावरे, मुलगा ऋतिक अर्जुन ननावरे, मेव्हणा प्रमोद हरीभाऊ आबदागिरे व प्रविण हरीभाऊ आबदागिरे यांनी दगडाने, लोखंडी रॉडने व कळक (बांबु)ने मारहाण केल्याची फिर्याद अर्जुन रामचंद्र ननावरे (वय ४९, रा. धुळदेव, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. वरील आरोपींकडून माझ्याजीवाला धोका असल्याचेही फिर्यादीत रामचंद्र ननावरे यांनी म्हटले आहे. ही घटना २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सुवर्णा अर्जुन ननावरे व ऋतिक अर्जुन ननावरे (दोघेही रा. धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास म.पो.ना. पूनम तांबे करत आहेत.