
दैनिक स्थैर्य । 12 जून 2025 । फलटण । शहराच्या जवळच्या ठाकूरकी गावामध्ये काल अज्ञात मृतदेह आढळला होता. हा मृतदेह संदीप रिटे यांचा असून त्याच्या शरीरावर खोल जखमा आहेत. त्याच्या गुप्तांग अर्धवट कापले आहे. हा मृतदेह जमिनीत अर्धवट अवस्थेत पुरला होता, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार संदीप रिटे याच्या डोक्यात, गळ्यावर मार लागून खोलवर जखमा होत्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. संदीप रिटे याची सुझुकी मोटारसायकल ही फलटण तावडी रस्त्यावर रोडलगत लावण्यात आली होती. यावरुन संदीप रिटे याला अज्ञात इसमाने जबर मारहाण करुन, गुप्तांग कापून टाकले होते.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला असून दि. 10 रोजी सायंकाळी 5.30 ते 11 जून सकाळी 11.30 या दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद सोनाली संदीप रिटे यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.