ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट; ना.श्रीमंत रामराजेंची उपस्थिती


दैनिक स्थैर्य । दि. 02 डिसेंबर 2021 । फलटण । मुंबई दौर्‍यावर आलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपस्थित राज्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचाही समावेश होता.

भारतीय जनता पार्टी विरोधात राजकीय रणनितीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाच्या मंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेत त्यांच्याशी वार्तालाप केला. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!