चौथी पिढी उपाहारगृहात कार्यरत : स्वस्त दरात घरगुती पदार्थ मिळणारे हे उपहारगृह – मुंबईचे एक वैभव
स्थैर्य, मुंबई, दि. २६ : दादर स्टेशनवर उतरलं की अनेकांची पावलं आधी पडत ती मामा काण्यांच्या या उपाहारगृहाकडे. वयाची शंभरी गाठलेलं हे मुंबईतील उपाहारगृह. मराठी माणसाचं आणि मराठी पदार्थ देणारं.
आज पन्नाशीच्या पुढच्या बहुतेक सर्वच मुंबईकरांना हे नाव माहित असणारच. नसेल तर तो खरा मुंबईकर नाही. मामा काण्यांचा बटाटावडा हा आख्ख्या मुंबईत फेमस होता.
उपाहारगृहात १९३५ मध्ये अवघ्या दोन आण्यामध्ये राइस- प्लेट मिळत असे. पुढे दाक्षिणात्य पदार्थ मुंबईत मिळू लागल्यानंतर मराठमोळे पदार्थ विकणार्या महाराष्ट्रीय हॉटेल नारायण विष्णु काणे उर्फ मामा काणे हे मूळचे कोकणातील गणपतीपुळे जवळच्या रिळे केशपुरी गावातील. पोटापाण्यासाठी त्यांनी गावाला रामराम ठोकला आणि नशीब आजमाविण्यासाठी त्यांनी १९०५ च्या सुमारास मुंबईचा रस्ता धरला. त्या काळी बाजारपेठेतील व्यापारी, कर्मचारी, कामगार आणि ग्राहक यांची गरज ओळखून मामा काणे यांनी १० फेब्रुवारी १९१० रोजी ‘दक्षिणी ब्राह्मणांचे स्वच्छ उपहारगृह’ या नावाने चहा-पाणी आणि नाश्त्याचे दुकान सुरू केले.
या उपाहारगृहात मिसळ, उसळ, कांदेपोहे असे अस्सल मराठमोळे पदार्थ मिळायचे. मामा काणे यांची आई आणि बहीण (मामा काणे यांची बहीण म्हणजे माझ्या सख्ख्या सौ शालनमावशीची सासू होय ) (लग्नाच्या आधी सौ मावशीचे यजमानांनी (श्री रामकृष्ण आपटे) सुद्धा मामा काणे यांच्या दुकानात काम केले आहे….
मामा स्वतः जातीने हे पदार्थ बनवायच्या. उपाहारगृहातील स्वच्छतेकडे मामा काणे यांचे कटाक्षाने लक्ष असे. स्वस्त दरात घरगुती पदार्थ मिळणारे हे उपहारगृह अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. दादरला रेल्वेतून उतरल्या उतरल्या प्रवासी मामा काणे यांच्या उपाहारगृहात जात असत. विशिक्षणासाठी मुंबईत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सकाळचा नाश्ता याच उपाहारगृहात ठरलेला असे..मराठी खाद्यसंस्कृती जपणार्या मुंबईतील मोजक्या उपाहारगहांमध्ये “मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह”चा क्रमांक बराच वरचा लागतो हे निश्चित.
‘खवय्यांच्या आवडीनिवडी ओळखून शंकररावांनी उपाहारगृहात अनेक बदल केले आणि ते यशस्वी ठरले. सुरुवातीला मामांच्या उपाहारगृहात कांदेपोहे, मिसळ, साबुदाणा खिचडी, थालीपीठ मिळत असे. १९२८ मध्ये त्यांच्याकडे चविष्ट बटाटावडा मिळू लागला आणि हा-हा म्हणता म्हणता या बटाटावडय़ांनी खवय्यांवर मोहिनी घातली. आपल्या उपाहारगृहात इडली, डोसाही उपलब्ध करून देऊन मामा काणे उपाहारगृह या स्पर्धेतही पाय रोवून टिकून राहिले. आजही त्याच निग्रहानं ते आपलं मराठमोळेपण जपून आहे.