मल्लिकार्जुन खरगे यांनी वागणूक पक्षहितकारक असावी – हेमंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या कॉंग्रेसला सध्या अतिस्तवाची लढाई लढावी लागत आहे.गांधी कुटुंबियांसह अनेक नेते पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.पंरतुपक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची वागणूक पक्ष हितकारक नाहीअसा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खरगे यांनी स्थापन केलेल्या सुकाणू समितीतून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे वरिष्ठ नेते शशी थरूर यांना डावलण्यात आले आहे.थरूर यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला या समितीत समाविष्ठ न करणे अयोग्य असल्याचे पाटील म्हणाले.

खरगे यांना पक्षाअंतर्गत विरोध होण्याची शक्यता कमीच आहे.थेट गांधी कुटूंबियांच्या जवळचे असल्याने त्यांचे पक्षातील इतर नेत्यांसोबतचे संबंध चांगले आहेत.पंरतुत्यांनी आता पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेसला नवसंजीवणी देण्यासह देशाच्या विकासाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे.मात्र पहिल्या दिवसांपासूनच ते पक्षांतर्गत आपल्या राजकीय विरोधकांचे पंख छाटण्याचे काम करीत आहेत,अशाने ते पक्षाला न्याय कसा देवू शकतीलअसा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वांना सोबत घेवून पक्षविकासहेच उद्दिष्ट खरगे यांनी आता ठेवले पाहिजे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो‘ यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.मात्र राष्ट्रीय अध्यक्षांनी आता याअनुषंगाने विचार करण्याची वेळ आहे.अन्यथा राहुल यांनी कितीही मोठ्या यशस्वी यात्रा काढल्या तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही.पक्षाला एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान खरगे यांना पेलायचे आहे.अशात त्यांनी त्यांच्या स्वभावात बदल करून सर्वांना सोबत घेतले तरच पक्ष टिकेल,अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!