द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब बारामती च्या वतीने मल्लखांब दिन साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२३ । बारामती । जिल्हा क्रीडा संकुल येथे जागतिक मल्लखांब दिन निमित्त ( गुरुवार १५ जून) द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब बारामती यांच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केली व मल्लखांब ची पूजा केली.

राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक शिवानी गवळी काटकर,आकाश गवळी व सहकारी खेळाडू यांनी मल्लखांब खेळाबद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले.

या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, हॉलीबॉल प्रशिक्षक शिवाजी जाधव, जिम प्रशिक्षक अनिल जगताप, कराटे प्रशिक्षक रवींद्र कराळे, अभिमन्यू इंगोले, राजेंद्र घुले ,मिनानाथ भोकरे आदी मान्यवर उपस्तीत होते.

मल्लखांब या खेळाचे संशोधक व आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (इ.स. १७८०-१८५२) ओळखले जातात. बाळंभट देवधर हे जाणकार कुस्तीगीर आणि कसरतपटू होते .पुरातन काळापासून मल्लखांब ही भारतीयांनी दिलेली जगाला महान देणगी आहे . जीवनात वापर करून किंवा नियमित सराव केल्यामुळे शरीरात चपळता येते, सर्वांगीण व्यायाम होतो व संतुलन राहण्यास मदत होते जागतिक क्रीडा प्रकारात याचा समावेश केल्याने अनेक खेळाडूंना करिअर घडवण्याची संधी मिळत असल्याचे प्रशिक्षक शिवानी गवळी काटकर यांनी सांगितले. मान्यवरांचे आभार शिवानी गवळी काटकर आणि आकाश गवळी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!