दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । सातारा । मलकापूर नगरपंचायतीचे कराड दक्षिण परिसरातील मोठे नेते मनोहर भास्कर यादव व नगरसेवक राजेंद्र प्रल्हाद यादव तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र तेली व संजीवनी शंकराव दळवी यांनी शासनाची फसवणूक करून नगरपंचायतीकडे जमा झालेल्या कामगार कल्याण निधीचा अपहार केल्याप्रकरणाचा तपास करून अंतिम अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करावा असे आदेश कराड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस एम सरोदे यांनी नुकतेच कराड पोलिसांना दिले आहेत
याबाबतची माहिती साताऱ्यातील प्रसिद्ध बांधकाम विकसक सलीम कच्छी आणि वकील साबीर कच्छी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . साबीर कच्छी पुढे म्हणाले साताऱ्यातील प्रसिद्ध विकसक सलीम कच्छी यांनी कराड येथील न्यायालयात या निधी अपहाराच्या प्रकरणासंदर्भात फौजदारी खटला क्रमांक 353 /2022 अन्वये दाखल केला आहे.
कच्छी हे कच्छी प्रॉपर्टीज कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार असून त्यांचे गृहप्रकल्प सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रगती पथावर आहेत मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये कच्छी प्रॉपर्टीज यांनी संस्कृती सिटी नावाचे निवासी गृह प्रकल्पाचे काम सुरू केले होते मलकापूर नगरपंचायतीने बांधकाम परवाना मिळावा म्हणून अर्ज सादर केला त्यावेळी संपूर्ण प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या एक टक्के रक्कम कामगार कल्याण निधीसाठी भरून घेण्यात आली. त्यानुसार कच्छी यांनी 502286 रुपये हा निधी मलकापूर नगर परिषदेकडे जमा केला केंद्रशासनाने बिल्डींग अँड ओनर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर अॅक्ट 1996 बिल्डींग अँड ओनर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर सेस 1998 हा कायदा अस्तित्वात आणून महाराष्ट्रातील दहा लाख बांधकाम मजुरांना या कायद्याद्वारे संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे कामगार कल्याण मंडळातर्फे हा संपूर्ण निधी त्यांच्या कल्याणाकरता वापरला जातो कायद्यातील तरतुदीनुसार वसूल रकमेपैकी एक टक्के स्वतःकडे ठेवून उर्वरित 99 टक्के रक्कम ही वेलफर बोर्डाकडे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने पाठवणे बंधनकारक आहे असे असताना मलकापूर नगरपंचायतीने यांनी2015 मध्ये ठराव करून जमा झालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम स्वतःकडे ठेवून 50 टक्के रक्कम संबंधित मंडळाकडे होईल अशा पद्धतीचा ठराव केला या ठरावाची अंमलबजावणी2015 ते 23.12.2020 पर्यंत सुरू होती तर ग्रह प्रकल्पाच्या माध्यमातून कितीतरी करोड रुपये नगरपंचायतीने एक टक्का रककम कामगार कल्याण निधीच्या नावाखाली वेगवेगळ्या बिल्डरांकडून वसूल केले आहेत तथापि गोळा झालेल्या रकमेपैकी 50% रक्कम बिल्डिंग अनदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर्स अथोरिटीकडे पाठवण्यात आलेली आहे असा दावा नगरपंचायत करते.
सन 2015 ते 2020 अशा पद्धतीची बेकायदेशीर वसुली मलकापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी संमतीने केली आहे त्याचा कोणताही हिशोब त्यांनी सादर केलेला नाही या ठरावाची उपविधी बनवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही साधारण गेल्या पाच वर्षात सेस फंडाच्या नावाखाली मलकापूर नगरपंचायतीने साधारण 15 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सलीम कच्छी यांच्या वतीने साबिर कच्छी यांनी केला या प्रकरणाची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर शेखर सिंह यांनी या संदर्भातील अहवाल मागवला या संदर्भातील दाखल झालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी 31 12 2020 रोजी या ठरावाला स्थगिती दिली आहे निधी अपहार चुकीच्या पद्धतीने झाला म्हणून तक्रारदार सलीम कच्ची हे कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते मात्र पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही तसेच पत्र त्यांनी पोलिस अधीक्षक अजित कुमार बंसल यांनाही सादर केले होते अधिक्षकांनी संबंधित तपास अधिकाऱ्यांना तातडीच्या तपासाच्या तोंडी सूचना दिल्या मात्र त्यापुढेही काही हालचाल झाली नाही त्यामुळे सलीम कच्ची यांनी कराड येथील न्यायालयात खाजगी फौजदारी खटला दाखल करून बिल्डिंग अनदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर च्या तरतुदीचा भंग झाल्याचा दावा करून मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी नगरसेवक व नगरपरिषदेचे सर्व मनोहर शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती जमा झालेली रक्कम ही असंघटित कामगारांच्या कल्याणाकरता वापरायचे आहे मात्र या निधीचा अपहार झाल्याची तक्रार फिर्यादी तर्फे करण्यात आली.
अॅक्ट मधील तरतुदी भारतीय दंड विधानातील तरतुदी तसेच माहिती अधिकारात केलेल्या अर्जांचा निकाल निकाल वरील सर्व कागदपत्रे ही कराडचे मुख्य न्याय दंडाधिकारी एस एम सरोदे यांच्यापुढे मांडण्यात आली या परिस्थितीत गुन्हा नोंदवून घेणे आणि त्याची निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे असा युक्तिवाद साबीर कच्छी यांनी कोर्टासमोर केला कामगार कल्याण निधीसाठी जमा केलेली रक्कम करोडो रुपये असून सदर रकमेचा विनियोग कामगार कल्याणासाठी न करता त्याचा अपहार झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे सदरची रक्कम कोट्यवधींच्या घरात असून रकमेबाबत मलकापूर नगरपंचायत हिशोब देत नाही सदर रक्कमे संदर्भात कोणताही खुलासा देण्यात आले नाही यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचा युक्तिवाद अॅड कच्छी यांनी न्यायालयात केला . या संदर्भात दाखल केलेली कागदपत्रे पाहता हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याचा खोलवर तपास होणे गरजेचे आहे असा प्रथमदर्शनी निष्कर्ष न्यायालयाने नोंदवून कराड तालुका पोलीस स्टेशनला सलीम कच्छी यांनी दाखल केलेल्या अर्ज हा फिर्याद म्हणून नोंदवून घेऊन त्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद घ्यावा आणि या सदर गुन्ह्याचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोन महिन्याच्या आत अंतिम अहवाल पाठवावा असे आदेश दिले आहेत.
या प्रकरणासंदर्भात मलकापूर नगरपंचायत अशा चुकीच्या पद्धतीने निधी वसूल करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका असून या तक्रारीमुळे निधी प्रकरणाचे सर्व गौडबंगाल त्यातील सत्य कराड जनतेच्या समोर येणार असल्याचा दावा सलीम कच्छी यांनी केला.