दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र माळी समाज महासंघ, पाक्षिक महामित्र परिवार यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे ३३ वा माळी समाज वधू-वर-पालक परिचय मेळावा रविवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात वधू-वर-पालक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाक्षिक महामित्रचे संपादक दशरथ फुले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी दशरथ सदाशिव फुले, संपादक पाक्षिक महामित्र, फुले बिल्डिंग, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे समक्ष अथवा मोबाईल क्रमांक ९८२३२७२५२३ यावर संपर्काचे आवाहन केले आहे.