वाई मतदार संघात सर्वांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबविणार मकरंद पाटील : सिरम इन्स्टिट्यूट बरोबर चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि.०७: करोना संसर्गामुळे वाई, खंडाळा,महाबळेश्वर मतदारसंघातील औद्योगिक ,पर्यटन, शेतकरी आदी क्षेत्रातील अर्थकारण बिघडले आहे. करोना संसर्गाची मोठी भीती लोकांच्या मनात आहे .यासाठी जनतेच्या मोफत लसीकरणाची स्वतंत्र मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे

वाई नगरपालिकेच्या सभागृहात आमदार मकरंद पाटील यांनी पुढील महिन्यात मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या मोफत लसीकरण मोहिमेबाबत बैठक बोलाविली होती. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले ,गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर ,मुख्याधिकारी विद्या पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व नगरसेवक आदी उपस्थित होते.

जानेवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या लाटेमध्ये अनेक लोक बाधित झाले कुटुंबे उध्वस्त झाली, लोकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे बंद पडले आणि अर्थकारण बिघडले. यापुढे तिसरी लाट येण्याचा धोका आहे यामध्ये जास्तीत जास्त लहान मुले बाधित होतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे .आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मतदारसंघात आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करत आहोत व केल्या ही आहेत. लसीकरण झालेल्या व्यक्तीला करोना होत नाही आणि झाला तरी त्याला त्याचा मृत्यू होत नाही असं तज्ञांचे मत आहे.यासाठी लसीकरण हाच उपाय आहे . परंतु पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या लोकांमध्ये लसीकरणाबाबत तीव्र असंतोष आहे.लस तोकडी मिळत आहे लस उपलब्ध होण्यामध्ये अनियमितता आहे. एकूणच लोकांचे जनजीवन आणि अर्थकारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिकची लस उपलब्ध करून देण्यासाठी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली.त्याप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर जाधव यांच्या बरोबर माझे बोलणे झाले .त्यांनी उपलस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समित्या नगरपालिका तसेच उद्योजक बँका पतसंस्था यांनी सहकार्य करावे. नगरपालिकांचा निधी उपलब्ध होण्याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज महाबळेश्वर च्या बैठकीत चर्चा झाल्याचे झाली आहे .तळागाळातील लोकांपर्यंत सर्वांची सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण विरहित व पक्षीय हीच बाजूला ठेवून योगदान द्यावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बचुटे आणि मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी करोना परिस्थितीचा व लसीकरण मोहिमेचा आढावा सादर केला.

या बैठकीला वाई व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मागील दोन महिन्यांपासून शहरातील व्यापार पूर्णतः बंद असल्यामुळे त्यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ताबडतोब शहरातील प्रतीबंधक क्षेत्र खुले करावे अशी मागणी केली . अन्यथा व्यापारी उद्रेक होण्याची शक्यता आहे त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला. याबाबत पुढील आठवड्यात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!