दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | वाठार निंबाळकर पंचायत समिती गणाचे सदस्य व फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी ढवळ ग्रामपंचायतीचे सदस्य विजयकुमार लोखंडे यांनी केलेली आहे.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाल्याने श्रीमंत शिवरूपराजे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी द्यावी असेही ढवळ ग्रामपंचायतीचे सदस्य विजयकुमार लोखंडे यांनी स्पष्ट केलेले आहे.