दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतिपदी वाठार निंबाळकर पंचायत समितीचे सदस्य व फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष निवृत्ती खताळ यांनी केलेली आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी काम करण्याची संधी द्यावी. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे तालुक्यातील युवकांचे विविध प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवतील, अशी खात्री आम्हा सर्व युवकांना आहे असेही निवृत्ती खताळ यांनी यावेळी स्पष्ट केले.