विशेष मिशन इंद्रधनुष ५.0 लसीकरण मोहिम यशस्वी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई । बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापी नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणात असे आढळून आले आहे कि, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेले बालके हि पूर्ण लसीकरण झालेले बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यृ पावतात. या अनुषंगाने माहे ऑगस्ट 2023 पासून 3 फेऱ्यामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिग स्टाफ यांच्या मार्फत घरोघरी जावून सर्व्हे करण्यात यावा व लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा झाली. या सभेस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल चव्हाण जागतिक आरोग्य संघटना पुणेचे डॉ.चेतन खाडे तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेमध्ये गरोदर माता व शून्य ते 5 वर्ष वय असलेले बालक, जे लसीकरणापासून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी आहेत यांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करावयाचे आहे.सर्व आरोग्य संस्थांना यासंबंधित माहिती देणेत आलेली आहे. व आरोग्य संस्थाकडून माहिती घेणेबाबत कार्यवाही सुरु आहे.

सदर मोहिम तीन टप्पांमध्ये दि.7 ते 12 ऑगस्ट 2023, 11 ते 16 सप्टेबर 2023 व 9 ते 14 आक्टोबर 2023 या दरम्यान राबवली जाणार आहे. लसीकरण सत्राचे नियोजन शहरी व ग्रामीन अशा दोन्ही भागात केले जाईल. सर्व सत्रे U-WIN portal वर तयार करण्यात येणार आहेत.

तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी सदर मोहिम कालावधीमध्ये आपले अर्धवट राहिलेले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!