
दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समितीच्या सभापती युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना सभापती करावे अशी मागणी कांबळेश्वर ग्रामस्थांच्या वतीने युवा उद्योजक अमोल भिसे व योगेश भिसे यांनी केलेले आहे.
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर म्हणजेच आमचे बाळराजे यांचा फलटण तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. फलटण तालुक्यामधील युवकांचे संघटन करण्यामध्ये श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना यश आलेले आहे. फलटण तालुक्यातील युवकांना राजे गटाकडे वळवण्याचे काम सुद्धा श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे करीत आहेत. सततच्या जनसंपर्कामुळे श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातील विविध अडीअडचणी सोडवण्यामध्ये यश येत आहे. तरी पंचायत समितीच्या सभापती पदी संधी दिल्यानंतर फलटण तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे नक्कीच करतील, असेही युवा उद्योजक अमोल भिसे व योगेश भिसे यांनी स्पष्ट केले.