दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना कामकाज करण्याची संधी द्यावी, अशी मागणी फलटण तालुक्यातील युवकांच्या वतीने आदर्की खुर्दचे सरपंच सौरभ निंबाळकर यांनी केलेली आहे.
फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना करावे या बाबतची मागणी फलटण तालुक्यामधील हिंगणगावचे उपसरपंच शिवाजी भोईटे, परहरचे सरपंच अविनाश देशपांडे, बीबीचे उपसरपंच सचिन बोबडे, कापशी ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र कदम, शरेचीवाडी येथील शामराव कणसे, आदर्कीचे उपसरपंच धनाजी भंडलकर, विजय बोडके, सालपे येथील पंकज शिंदे व आदर्की खुर्दचे दत्तू कांबळे या सर्वांच्या वतीने आदर्की खुर्दचे सरपंच सौरभ निंबाळकर यांनी मागणी केलेली आहे.
फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये युवकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर वाढणे गरजेचे आहे. फलटण पंचायत समितीचे युवा व धडाडीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी कामकाज करण्याची संधी देऊन फलटण तालुक्यातील युवकांना एक अनोखा संदेश देण्यात यावा. फलटण तालुक्याच्या विविध विभागामध्ये युवक हे कामकाज करीत आहेत. विविध गटातील युवकांची संघटन करण्यासाठी आमचे युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी द्यावी, असे हि निंबाळकर यांनी स्पष्ट केले.