दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील युवकांचे आशास्थान व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना रिक्त झालेल्या फलटण पंचायत समितीच्या सभापती’पदी काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती भाऊसोा कापसे यांनी केली आहे.
विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाची सत्ता आहे. फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. फलटण तालुक्यामध्ये युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीच्या सभापती’पदी काम करण्याची संधी देण्यात यावी, असेही नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती भाऊसोा कापसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत विश्वजीतराजेंचा युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. तरी फलटण तालुक्यातील युवकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी श्रीमंत विश्वजीतराजे हे नेहमीच कार्यरत असतात. श्रीमंत विश्वजीतराजेंच्या रुपाने फलटण पंचायत समिती विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, असेही नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती भाऊसोा कापसे यांनी स्पष्ट केले.