दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । मुंबई । राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम समायोजन करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यानुसार संपूर्ण राज्यात 03 लाख पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायती पर्यंत सर्व विभागात काम करत आहेत. मागील 01 ते 20 वर्षांपासून काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी नियमित पदावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ते ज्या पदावर काम करत आहेत किंवा समकक्ष पदावर समोयोजित केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही, त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे साो., यांची नेहमीच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रति सहानुभूतीची व न्यायाची भूमिका असे अशी आख्यायिका आहे. ज्याअर्थी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत न्याय प्रविष्ट असलेल्या अनेक प्रकरणात मा. न्यायालाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत. संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समायोजन केले आहे. त्याअर्थी त्याचे आधार घेऊन राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत घेता येऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यात विविध शासकीय / निम शासकीय कार्यालयात आस्थापने वरील कंत्राटी, बाह्यस्त्रोत कंत्राटी, मानधना वरील कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विशेष बाब म्हणून राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असा निर्धार बैठकीत करण्यात आला त्याअनुषंगाने आम्ही मागणी केल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी सांगितले.
सदरहू निवेदन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू , कामगार विभाग प्रधान सचिव व कामगार आयुक्त यांना देखील देण्यात आले आहे. या दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मुकुंद जाधवर, सरचिटणीस शहाजी नलवडे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, महिला राज्याध्यक्ष माधुरी थोरात, सह चिटणीस प्रशांत गायकवाड, प्रमोद अहिरराव, राज्य उपाध्यक्ष विलास भोसले, इंजि. राजेंद्र बुरांडे, राज्य महिला उपाध्यक्ष अरुणा काकडे, राज्य उपाध्यक्ष मनोजकुमार म्हस्के, ओंकार जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.