
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: सरकार लवकरच गोल्ड मॉनेटायझेशन पॉलिसीमध्ये (gold monetization policy) मोठा बदल करणार आहे. याआधी 2015 मध्ये यावर काम करण्यात आलं होतं. पण त्याचा फारसा फायदा झाल्याचं दिसलं नाही. पण आता यामध्ये सोनं बँकेत ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. आता बँकांविषयी बोलायचं झालं तर, देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एक खास ठेव योजना आणत आहे. यामुळे ग्राहकांना यातून मोठी कमाई करता येणार आहे.
काय आहे योजना ?
ग्राहकाला हवं असल्यास 12 दिवस ते 15 वर्षे ठेव योजनेचा लाभ घेऊ शकतात. याला दीर्घकाळासाठी शासकीय ठेव किंवा एलटीजीडी असं नाव देण्यात आलं आहे. आर-जीडीएस अंतर्गत ग्राहकांसाठी किमान ठेव रक्कम आणि जास्तीत जास्त ठेव रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही कमीतकमी 30 ग्रॅम आणि पाहिजे तेवढे सोने बँकेत जमा करू शकता.
किती मिळेल व्याज ?
एका वर्षासाठी अल्प मुदतीच्या बँक ठेवींवर वार्षिक 0.50% दिलं जातं आहे. जर तुम्ही 1-2 वर्षांसाठी सोनं बँकेत जमा केलं तर त्यावर 0.55% व्याज मिळेल. जर 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांसाठी सोनं जमा केलं तर त्यावर 0.60 टक्के व्याज मिळेल. मध्यम मुदतीच्या सरकारी ठेवी किंवा एमटीजीडी वर वार्षिक 2.25 % व्याज दिलं जातं.
या कागदपत्रांची आवश्यकता
या योजनेंतर्गत सोन्याला कच्चं सोनं म्हणून स्वीकारलं जातं, म्हणजे सोन्याच्या पट्ट्या, मौल्यवान दगडं आणि इतर धातू, सोन्याचे दागिने स्वरूपात साठवले जातात. यासाठी अर्ज, ओळखपत्र, पत्ता प्रमाणपत्र आणि यादी फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत. एसटीबीडीमध्ये परिपक्वतेच्या तारखेला सोन्यातील मूळ रक्कम किंवा रुपयांमध्ये रक्कम निवडण्याचा पर्याय आहे.