मकरसंक्रांती हीच जीवन उन्नती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सूर्य मकर राशीत प्रवेश करुन उत्तरायण सुरु होणे अर्थात मकर संक्रमण होय. तीळा तीळाने दिवस मोठा होत जातो व थंडी काढता पाय घेते. तीळगुळ घ्या नेहमी गोड (खरे) बोला.याचा अर्थ तीळातील सिग्धपणा व सेंद्रिय गुळातील गोडवा शरीराला योग्य पोषणभर करतो. तसेच आपआपसातील मतभेद विसरुन विचार मंथन सुरु करण्याचा पुण्यकाल होय.

महिला वर्गाने या दिवशी कुंभारी मातीच्या संक्रांती (सुगडे-खण) पाच घेऊन त्यात ज्वारी कणीस, हरभारे, भुईमुग शेंगा, ऊस पेरे, बोरे इत्यादी टाकून छोटे बोळके (गुंडगी) सह पूजन करावे. विड्याची पाने, खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, लवंगा, वेलदोडे, (सुंठवठा करणे) लेकुरवाळी हळकुंडे, हळदी-कुंकू यांचा ववसा (वाण) पदरात घेऊन कुलाचार करणे. पुरणपोळी (पंचपक्वाने) खाण्याची आधी खेंगट व तीळ भाकर खावे.

संक्रांतीला सुवासिनीबरोबरच श्रीमतीचा सन्मान व्हावा.हळदी- कुंकू कार्यक्रम वेळी वाण म्हणून चांगल्या साहित्य कृतीचे वाटप करावे. मातीच्या संक्राती (खण) तयार करणे म्हणजे जीवन घडविणे. कुंभारराजे यांनी योग्य माती आणून त्यात पाणी ओतून पायाने व हाताने चिखल मळणे. नंतर चाकावर गोळा धरुन हाताच्या आधाराने सुगडी बनविणे. ऊन्हात वाळवून आवा तयार करुन भाजून काढणे. त्यातून तयार खण बाजारात नेऊन विक्री करणे. त्यात सुगडी, बोळके, गुडंगी, घट, माठ, डेरा, कलश, मडके विकले जाईल तसे गिऱ्हाईक व वापर. आपल्या जीवनात सुद्धा सहवास, संगत, संस्कार यावरच संक्रमण होय.

संक्रांत कश्याव आहे, साडी कोणत्या रंगाची परिधान करावी, शुभाशुभ आहे का, अलंकार कोणते ह्यावर विश्वास न ठेवता आपली उत्क्रांती करणे, लेकरांना घडविणे, संसार निगुती करणे, सगळ्यांशी नीट रहावे ह्या बाबी पाळल्यास सक्रात येणारच नाही. आलं ध्यानात तर रुजवा मनात. संस्कार, समर्पण यांचे नाव मकर संक्रमण.

तंग खेळताना मांजा वापर करु नका. तीळगुळाबरोबर स्नेह वाढवा

आपलाच संक्रमित ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण. ९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!