वाठार स्टेशन परिसरातील गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोळशी, दि. १५: वाठार स्टेशन, ता. कोरेगाव परिसरात काल दुपारी 2 च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्या पाठोपाठ पडलेल्या गारांचा रस्त्यावर व शेतात खच पडला होता. त्यामुळे कमी पावसाच्या या पट्ट्यात मिनी काश्मीर अवतरले की काय याचा भास होत होता. गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्ष बागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे रस्त्यावर, घराच्या छतावर व शेतात गारांचा खच पडला होता. या गारपिटीमुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही मुश्किल झाले होते. मात्र या बर्फाच्छादित दृश्यामुळे वाहन चालकांना जम्मू-काश्मीरमध्ये आल्यासारखे वाटत होते. हवामान विभागाने 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला होता. जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून लगातार पाऊस हजेरी लावत आहे.

दुपारी या भागात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये संपूर्ण रस्त्यावर बर्फच बर्फ दिसत होता. या गारपिटीने शेतात व रस्त्यावर अर्धा ते एक फूट गारांचा खच पडला होता. या गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या फळबागांचा हंगाम सुरू आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे यापूर्वीच सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच या परिसरात आज झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कलिंगड व केळी बागांसोबत कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!