दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार फलटण येथे ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले असून फलटण शहरात ते यशस्वीपणे राबवणार असल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी संजय गायकवाड बोलत होते.
‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत विविध संकल्पना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित झालेल्या आहेत. त्यानुसार फलटण नगर परिषद ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान यशस्वीपणे राबवणार आहे. यामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबांमधील व्यक्तींच्या हस्ते शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाचवा टप्पा येथे अमृत सरोवर तयार करून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.