जिल्ह्यात सहा ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर दि. 30 : सोलापूर जिल्ह्यात मका भरडधान्याच्या किमान आधारभुत खरेदीसाठी सहा केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे माळकवठे तालुका  दक्षिण सोलापूर, अनगर तालुका  मोहोळ,  पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, अकलूज  आणि नातेपुते येथे सुरू केली आहे. अशी माहिती जिल्हापुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. 

माळकवठे, अनगर,पंढरपूर,मंगळवेढा,अकलूज,नातेपुते  या खरेदी केंद्रास काही अटी व शर्तीवर ही मान्यता दिली आहे. सर्व संबंधित तहसीलदार यांनी ज्या बारदाना मध्ये भरडधान्य भरलेले आहे ते विहित कार्यपद्धतीमध्ये आहे अथवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे. तसेच तहसीलदार व खरेदी अभिकर्ता संस्था प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे बारदान याचा पुरवठा होत असताना संयुक्तपणे तपासणी करावयाची आहे.  केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या या निर्देशानुसार महिना निहाय साठा विवरणपत्र, बारदाना लेखे, गोदाम भाडे करार, वाहतूक भाडे दरपत्रक इत्यादी आवश्यक दस्ता ऐवज अभीलेखीत करावेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!