महेश साबळे यांच्या राष्ट्रपती पदकामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला


 

आ. शिवेंद्रसिंहराजे; २०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या साबळेंचा केला सत्कार 

स्थैर्य, सातारा, दि. २८ :  सातारा ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी भूमीत जन्मलेले हजारो वीर देश रक्षणासाठी प्राणांची बाजी लावत आहेत. याच भूमीतील महेश साबळे या युवकाने लोअर परळ, मुंबई येथील कमला मिलला लागलेल्या आगीच्या घटनेत २०० जणांचे प्राण वाचविले. याबद्दल साबळे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला. साबळे यांच्या धाडसामुळे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, असे गौरवोद्गार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. 

सातारा तालुक्यातील पिलाणी (खालची) या गावचे सुपुत्र महेश साबळे यांनी लोअर परळ येथील कमला मिलला लागलेल्या भीषण आगीच्याप्रसंगी धाडस दाखवून २०० जणांचे प्राण वाचविले. त्यामुळे संपुर्ण भारतातुन एकमेव राष्ट्रपती सर्वोत्तम जिवन रक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. या धाडसाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते साबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, शेंद्रे गटाचे संतोष कदम, शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके,  अशोक कदम फौजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान, कौंदणी गावचे सुपुत्र दिलीपराव यादव यांची भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबईचे  जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड झाली, त्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचा सत्कार केला. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!