बारामती नगरपरिषद पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : महेश रोकडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । बारामती । राज्यामध्ये अनेक पतसंस्था आहेत परंतु बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेने आर्थिक घडी बसवून आर्थिक शिस्तीचा आदर्श घालून दिला आहे त्यामुळे पथसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले. बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये महेश रोकडे बोलत होते.

याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे गटनेते सचिन सातव, चेअरमन सुनील धुमाळ, व्हाईस चेअरमन प्रतिभा सोनवणे, संचालक राजेंद्र सोनवणे, भालचंद्र ढमे, चंद्रकांत सोनवणे, फिरोज आत्तार, दादासाहेब जोगदंड, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे, अजय लालबिगे, दीपक आहिवळे, सुवर्णा भापकर, सचिव अनिल गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यामध्ये पतसंस्थेने सहकार पुरस्कार प्राप्त केला हीच खरी सभासदाच्या व संचालकांच्या यशाची पावती असल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.

गटतट विसरून सर्व संचालक एकत्रित उत्कृष्ट कार्य करत असल्याने संस्थेची प्रगती होत असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले
संस्थेच्या प्रगतीचा आढावा चेअरमन सुनील धुमाळ यांनी घेतला तर अहवाल वाचन सचिव अनिल गोंजारी यांनी केले.
या प्रसंगी दहावी व बारावी मधील उत्तीर्ण सभासदाचे पाल्य व सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
सभासदाच्या शंकाचे निरसन संचालक मंडळाने केले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र सोनवणे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!