दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । बारामती । बारामती शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी उत्पत्ती दिवस व महेश नवमीचे औचित्य साधून दि.२८ व २९ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
दि. २८ मे २०२३ रोजी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. समाजाचे जेष्ठ श्री सत्यनारायणजी सोनी, श्री. माणिकलालजी सोमानी, श्री. श्रीकांतजी सिकची, श्री. शामसुंदरजी सिकची व श्री. मोहनजी पालीवाल यांचे कडून शिव मूर्तीस पुष्पमाला अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये २८ जणांकडून रक्तदान करण्यात आले.
दि. २९ मे २०२३ ला सकाळी सर्व माहेश्वरी बांधव व भगिनी बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे एकत्रित येवून तेथील शिव मूर्तीस पुष्पमाला अर्पण करून महेश वंदना व आरती केली. तेथून सर्वजण बालाजी मंदिर येथे येऊन शिव मूर्तीची पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी माहेश्वरी समाजातील सर्व बांधव व भगिनीचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे बारामती तालुका माहेश्वरी सभा. अध्यक्ष श्री शामसुंदर सोनी, सचिव. सिद्धार्थ सोमानी, महिला समिती अध्यक्ष सौ. जया पल्लोड, सचिव. मनिषा सिकची यानी दिली.