
दैनिक स्थैर्य । 2 मे 2025। फलटण । बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण शाखेच्या पदग्रहण समारंभाचे शनिवार दि. 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सयाजी गार्डन येथे आयोजन करण्यात आले आहे.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण शाखेच्या 2025- 26 यावर्षासाठी महेंद्र जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सेक्रेटरीपदी मंगेश शिंदे, व्हाईस चेअरमनपदी सागर शहा, खजिनदारपदी विकास म्हेत्रे, संयुक्त सचिवपदी सुहास सस्ते, कौन्सिल सदस्यपदी किरण दांडिले यांच्या निवडी करण्यात आल्या. कार्यकारिणी समितीमध्ये रणधीर भोईटे, प्रमोद निंबाळकर, दिलीप शिंदे, दत्तात्रय बोबडे, राजेंद्र निंबाळकर, व्ही. एन. जाधव, मुकेश कोळेकर, नितीन बोबडे, आर. एस. माने, अंकुश गिरमे, तुषार खिलारे यांचा समावेश आहे.
हा पदग्रहण समारंभ माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्रचे चेअरमन जगन्नाथ जाधव हे उपस्थित आहेत.
आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेतील विरोधीपक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या पदग्रहण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन किरण इंडिले व सेक्रेटरी स्वीकार मेहता यांनी केले आहे.