ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या झंजावातामुळे इचलकरंजी महापालिकेवर महायुतीचा झेंडा


स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : राज्यात नुकत्याच झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत भाजपा महायुतीने काही अपवाद वगळता विविध महानगर पालिकेवर विजय मिळवला. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत स्टार प्रचारक आणि निवडणूक प्रभारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री,मत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या झंजावातामुळे भारतीय जनता पार्टीचे तब्बल 43 उमेदवार विजयी झाले. ना. शिवेंद्रसिंहराजे प्रभारी असलेल्या इचलकरंजी महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असून भाजप- महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः इचलकरंजी येथे प्रचारदौरा काढून सभा, भेटीगाठी, बैठका घेऊन भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला होता. सभा, बैठका यासह प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन महायुती सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, विकासकामे जनतेपर्यंत पोहचवून मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या करिष्म्यामुळे इचलकरंजी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकट्या भारतीय जनता पार्टीचे 43 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झाला. ना. शिवेंद्रसिंहराजे व स्थानिक पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने महानगर पालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

झालेल्या निवडणुकीत विरोधी शिवशाहू आघाडीला 17, शिवसेना (उबाठा) 1 एवढे उमेदवार निवडनू आले आहेत. भाजप निवडणूक प्रभारी असलेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली भाजप- महायुतीने तब्बल 47 जागांवर विजय मिळवून महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व विजयी उमेदवार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!