दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी फलटण यांच्या कार्यालयाला भेट देऊन मुख्य अभियंता यांची भेट घेतली शेतकऱ्यांच्या कृषी पंप व विजे संदर्भातील अडचणी या बद्दल तक्रारी देऊन त्यावर चर्चा केली.
फलटण तालुक्यातील वाठार नि. येथील सहाय्यक अभियंता सुरेश कुंभार यांच्या भ्रष्ट कार्यपद्धती विरुद्ध वारंवार तक्रारी देऊन ही त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नव्हती. त्यासंदर्भात आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांसमोर आज पर्यंत दिलेल्या सर्व अर्जंच्या उत्तराबद्दल जाब विचारण्यात आला.
शेतकऱ्यांचे जळालेले डीपी हे बसवून देण्याची पूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची असून वरिष्ठ सर्वाधिकार्यांनी ती मान्य केले आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली आम् आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे.
तसेच जर त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कार्यवाही न घेतल्यास फलटण तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विहिरी वरती जाऊन कोणतेही मीटर रिडींग न घेता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखोंची बिल देऊन लुटत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सर्व शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्या संदर्भात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेना व आम् आदमी पार्टी फलटणच्या वतीने एक पत्र देण्यात आले तसेच लवकरात लवकर सर्व बाबींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याचे परिणाम सर्व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना भोगावे लागतील असा इशारा आम् आदमी पार्टी फलटण तर्फे देण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल याची ग्वाही वरिष्ठांनी दिली. सादर प्रकरण मध्ये जो पर्यंत शेतकऱ्याना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आम्ही आपल्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासाठी येत राहू असे बजवण्यात आले.
सर्व वरिष्ठांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्या बद्दल त्यांचे आभार.
या वेळी उपस्थित आम आदमी पार्टी चे तालुकाध्यक्ष धैर्यशील अंकुशराव लोखंडे, उपाध्यक्ष/ संघटक वीरसेन सोनवणे, आम् आदमी पार्टी कोषाध्यक्ष / भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे सातारा जिल्हा अध्यक्ष अनिकेत किसन नाळे, सरडे गावचे सन्माननीय सत्यवान धायगुडे, विडणी गावचे शेतकरी जगन्नाथ शेंडे उपस्थित होते.