
दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । बिजवडी । बिजवडी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस – राष्ट्रीय कॉग्रेस – शिवसेनेच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पँनेलने भाजप – रासप- शेखर गोरे गट पुरस्कृत पँनेलचा १२-१ ने पराभव करत सोसायटीवर वर्चस्व मिळवले आहे.
बिजवडी सोसायटी निवडणूकीत महाविकास आघाडीच्या पँनेलमधून शंकर बापू जाधव, बापू जोतीराम दडस, विकास जिजाबा निंबाळकर, लालासो गणपत पवार, कुंडलिक दादासो भोसले, जनार्दन बाबुराव भोसले, प्रज्योत हणमंत भोसले, रुक्मिणी पंढरीनाथ भोसले, कमल आनंदराव विरकर, पांडुरंग नाना साळुंखे, यशवंत म्हंकाळ गाढवे, अशोक रघुनाथ अडागळे तर भाजपकडून संजय दादासो भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयी महाविकास आघाडीप्रणित पँनेलचे राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे अँड. कुंडलिक भोसले, रंगाशेठ भोसले, उपाध्यक्ष विकास निंबाळकर यांनी नेतृत्व केले होते. राष्ट्रीय कॉग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी तर शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी नेतृत्व केले होते. तर पराभूत झालेल्या पँनेलचे भाजपतर्फे माजी उपसरपंच संजय भोसले, रासपतर्फे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर तर शेखर गोरे गटातर्फे माजी सभापती तुकाराम भोसले यांनी नेतृत्व केले होते. या सोसायटीसाठी बिजवडी, जाधववाडी , येळेवाडी गावचे मतदान होते.
नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, पंढरीनाथ भोसले, अनिल भोसले सर, रंगाशेठ भोसले, हणमंतराव भोसले, आनंदराव विरकर, शिवाजीराव बरकडे, जोतीराम जाधव तसेच राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
महाविकास आघाडीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.