महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शुभारंभ जिल्ह्यातील ८२ हजार ४३५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्री मंडळातील इतर सदस्य, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरृदष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

शेतकरी नियमित पिक कर्ज भरत आहेत अशा ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांनी तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. प्रोत्साहनपर योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. पहिली यादी प्रसिद्ध झाली असून ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे नाहीत त्यांनी काळजी करु नये त्यांचीही यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी प्राथमिक स्वरुपात शेतकऱ्यांचा सत्कारही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्ह्यातील 82 हजार 435 शेतकऱ्यांना होणार प्रोत्साहनपर योजनेचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत 3 लाख 69 हजार 140 शेतकऱ्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली आहेत. आज अखेर 84 हजार 108 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तर 82 हजार 435 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 98.60 टक्के काम पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अंदाजित 290.23 कोटी रक्कम जमा होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!