महात्मा जोतिबा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार आणि सावित्रीची लेक पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । पुणे । महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात ज्ञान फाऊंडेशन पुणे तर्फे महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी निमित्त महात्मा जोतिबा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार 2021 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्या महामंडळाचे प्रमुख ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ.ल.देशमुख यांना डाॅ. सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महात्मा जोतिबा फुले यांची पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सावित्रीची लेक पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले. या पुरस्काराने आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, आणि प्राणीमित्र अमृता उबाळे यांना गाैरविण्यात आले. यावेळी मैत्र दिव्य मित्र संघाचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महावितरण पुणेचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार,ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृता उबाळे म्हणाल्या, “फुले दाम्पत्याने समाजाच्या आक्षेपांना न जुमानता आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. त्यांनी कधीही कोणाबद्दलही वाईट भावना ठेवली नाही. त्यांच्या जीवनातील कार्यातून महत्त्वाचा धडा असेल तर तो, म्हणजे सर्वांप्रती सहानुभूती बाळगणे आणि निस्वार्थपणे काम करणे. मला असे वाटते की करुणा हा मानवामध्ये एक उपजत गुण आहे, पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण आपल्या कंडिशनिंगमुळे हा गुण गमावतो. आणि लहान मुले म्हणून आपण प्राण्यांबद्दल दयाळू असतो. माझा ठाम विश्वास आहे की भविष्यात अशी वेळ येईल जिथे आपण एकेकाळी प्राण्यांवर अत्याचार आणि कत्तल होते हे जाणून धक्का बसला. आणि मला माहीत आहे की तुमच्या पाठिंब्याने हा दिवस लवकरच पाहायला मिळेल.”

महावितरण पुणेचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह पुरस्कार्थैंनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केली. संतोष चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर अमर परदेशी-राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!