
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। फलटण । येथील वीरशैव लिंगायत समाज सामाजिक संस्थेच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवाच्या निमित्ताने बुधवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता श्री अवधूत स्वामी मंदिर मलठण येथे महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता वीर शैव महिला भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते. रात्री आठ वाजता श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन झाले.
दरम्यान फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी श्रीमंत अनिकेतराजे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शुक्रवार दि. 2 वाजता सकाळी 8 वाजता महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता नवलबाई मंगल कार्यालय मारवाड पेठ येथे महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.