दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.