विडणीतील उत्तरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची भक्तिमय धूम; कीर्तन, लघुरुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन


विडणी येथील पुरातन उत्तरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवलीलामृत पारायण, कीर्तन, लघुरुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन. भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.

स्थैर्य, विडणी, दि. १४ फेब्रुवारी : महाशिवरात्री निमित्त विडणी येथील पुरातन उत्तरेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आज शनिवार, दि. १४ रोजी सकाळी शिवलीलामृत पारायणास प्रारंभ झाला असून रात्री ९ वाजता ह.भ.प. पांडुरंग महाराज शेळके (गारकुले) यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी, दि. १५ रोजी महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी सकाळी पारायणानंतर भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता ह.भ.प. बाळासाहेब गाडेकर महाराज यांचे बेलाचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

त्यानंतर आरती, बेल पुष्पवृष्टी तसेच लघुरुद्राभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. सोमवारी सकाळी शिवलीलामृत पारायणाची सांगता झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने विडणी परिसरातील तसेच फलटण तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!