
दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | येथील शुक्रवार पेठेतील पुरातन श्री माणकेश्वर महादेव मंदिरात बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा लाभ शिव भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त श्री माणकेश्वर मंदिरात बुधवार, दि. २६ रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ लघुरुद्र महाअभिषेक, दुपारी ४ ते सायं. ५ : ३० दादामहाराज महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ : ३० वाजता महाआरती व संतांचे संगती भजन मालिका पुस्तकाचे प्रकाशन, सायं.७ : ३० ते रात्री ९ या वेळेत शिवरुद्र ढोल ताशा ध्वज पथक व आईसाहेब हलगी पथक फलटण यांचा वादनाचा कार्यक्रम, रात्री ९ : ३० वाजता एकतारी भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गुरुवार, दिनांक २७ रोजी सायंकाळी ७ : ३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांवेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून फलटण पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री माणकेश्वर भक्त मंडळ, योद्धा ग्रुप (शनि नगर, शुक्रवार पेठ) यांच्यावतीने करण्यात आले आहे.