
सातारा – महाशिवरात्री संगीत नृत्य महोत्सवाचे उद्घाटन करताना गुरु कल्पना बालाजी, उषा शानभाग, रमेश शानभाग, रमेश हलगेकर व ब्रह्मवृंद. (छाया – अतुल देशपांडे)
स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : येथील उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात ’महाशिवरात्री’ निमित्त संगीत व नृत्य महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग या महोत्सवाच्या संयोजिका सौ.उषा शानभाग,पुणे येथील ज्येष्ठ गुरु व नृत्यांगना कल्पना बालाजी, उद्योजक रमेश हलगेकर,वासुदेवन नायर तसेच मंदिराचे ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर ब्रह्मावृंदांनी वेदमंत्रांचा जयघोष केला
उषा शानभाग म्हणाल्या, गेली 34 वर्षे हा महोत्सव बहरत आहे. संपूर्ण देशातून नव्हे तर विविध ठिकाणाहून नृत्य कलाकार,गायक, वादक चित्रकला कलाकार यांचे तसेच शिल्पकारांचे ही प्रोत्साहन लाभत आहे. हा महोत्सव महाशिवरात्री रात्रीच्या वेळी महाजागरण करून 16 तारखेपर्यंत आयोजित केला आहे. शहरातील स्थानिक कलाकारांनी उपस्थित राहून आपली कला सादर करावी
गुरु कल्पना बालाजी यांनी असा महोत्सव सातार्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अनेक वर्ष संपन्न होत आहे याचे विशेष अवचित्य वाटत असून त्यांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार अतुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले .
भरतनाट्यम नृत्य सोहळ्यात भरतनाट्यम कार्यक्रमाची सुरुवात कल्पना बालाजी यांच्या शिष्या शितल श्रीधरन यांनी श्री गणेश वंदनेने केली. संगीतकार व प्रसिद्ध कवी मुत्तू स्वामी दीक्षितर यांच्या जयंतीनिमित्त ही रचना षणमुखप्रिया रागात, रूपक तालात ..सिद्धिविनायक .. अशी होती. त्यानंतर राग बिहाग रागातील आदितलातील भगवान शिवाच्या आनंद तांडवावर सुरेख नृत्य सादर केले गेले .त्यानंतर आदिशक्ती मातेला अगस्ती महर्षी ऋषींनी रचलेली श्री चक्र राजा.. सिंहासनस्वरी ..हे देवी ललितांबिकेचे सौंदर्य वर्णन असलेली रचना रागमालिका रागात सादर झाली. त्यानंतर भगवान श्रीरामाचे संपूर्ण जीवन नृत्य दाखवणारी ..भावयामी रघुराम.. मालिका चतुश्र रुपक तालात सादर झाली .त्यानंतर ..वृंदावनी वेणू ..या संत भानुदास यांनी रचलेल्या काव्यावर ही लोकप्रिय गवळण शितल यांनी सादर केली. त्यानंतर सौ.अनुजा दातार आणि श्रीनिधी तिवाटणे यांनी भगवान शिव व माता पार्वती यांच्या आशीर्वादासाठी ..त्रिपुट.. ही नृत्य रचना सादर झाली .
या रचनेला स्वर होता चित्रा आपटे यांचा .त्यानंतर भक्तीरस प्रधान नृत्य प्रस्तुती जी श्री पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी समर्पित केली . विठ्ठल स्मरण.. सादर होऊन त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी गुरु नृत्य रचनाकार संकल्पना बालाजी होत्या, तर अनुजा दातार यांची सहनिर्मिती होती संकल्पना वर्षा तिवाटणे यांची होती .मंदिराचे वतीने सौ.उषा शानभाग यांनी सौ.कल्पना बालाजी ,व शिष्या श्रेया,श्रीनिधी,शितल श्रीधरन, सौ.अनुजा दातार यांचा प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला.
मंदिराचे व्यवस्थापक श्री.चंद्रन यांचेसह मंदिराचे मार्गदर्शक नारायण राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महोत्सवात रविवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नटरंग अकॅडमी ग्रुप, पुणे यांची भरतनाट्यम नृत्य सेवा संपन्न होणार आहे.
