दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । शिखर शिंगणापुर । अखिल महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री क्षेत्र शिंगणापुरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाची दुग्धाभिषेक महापूजा संपूर्ण महादेव मंदिरामध्ये फुलाच्या माळा फळाच्या कमानी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाच्या दर्शन व महापूजा खासदार श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते करण्यात आली छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कुलदैवत आहे. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे स्वागत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, हरित वसुंधरा टीम माण-खटाव ग्रामपंचायत शिंगणापूरचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य शिंगणापूर विकास सोसायटीचे आजी-माजी संचालक व चेअरमन देवस्थान समितीचे ओकार देशपांडे ज्येष्ठ पत्रकार दीपक बडवे तसेच सर्व ग्रामस्थ शिंगणापूर वृक्षप्रेमी रोहित बनसोडे, त्याचबरोबर फलटणचे सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर जे. टी. पोळ, डॉ. कर्णे, हरित वसुंधरा टीम माण-खटावचे सहकारी खोत काका कारंडे काका, मुंशी काका, भरतेश शेठ गांधी, संदीप खाडे सर, बदाने सर, पाणी फाउंडेशनचे साबळे सर, जठार सर, शिखर शिंगणापूर शंभू मंदिराचे मुख्य पुजारी व सेवेकरी सर्व शंभू भक्त उपस्थित होते. सर्वांनी छत्रपती उदयन महाराज यांचे जंगी स्वागत केले व महाराजांनी शिंगणापूर नगरीमध्ये भेट दिली त्याबद्दल आभार मानले.
पुष्कर तिर्थ व हरित वसुंधरा कामाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी हरित वसुंधराची टीमसह माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी लोकसहभागातून तीर्थ क्षेत्र शिखर शिंगणापुर मध्ये विविध योजना राबवण्याचे काम सुरु आहे. त्या कामाची पाहणी करून खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले. या विधायक कामासाठी आपल्या स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केली.