
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज फलटण नगरपरिषदेच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता गायकवाड आणि अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजू मारुडा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे, नगरपरिषदेचे अधिकारी नलगे, सपाटे, तसेच संजय पुजारी, युनियनचे उपाध्यक्ष रमेश वाघेला, युवा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष आनंद डांगे आणि पुणे विभागीय अध्यक्ष मयूर मारुडा यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. ही माहिती संघटनेचे सचिव नितीन वाळा यांनी प्रसिद्धीसाठी दिली.