दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । ‘‘भारतात असणार्या शेळ्यांपैकी महाराष्ट्रीयन शेळ्यांचे चमडे जागतिक पातळीवर सर्वात उत्तम दर्जाचे आहे’’, असे मत चेन्नई येथील चमड्याचे व्यापारी रनीतम यांनी व्यक्त केले.
ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स येथील चमड्याच्या वस्तू व अॅक्सेसरीजमधील खास प्रसिद्ध ब्रँड असलेल्या हारमींर्न्स कंपनीचे या दोन्ही देशातून आठ सदस्यांचा अभ्यासगट ‘शेळीपालन आणि खाद्य व्यवस्था’ या अभ्यासदौर्यावर भारतात आले होते. त्याअनुषंगाने गरुड बंधू यांचे माधवानंद गोट फार्म आणि घाडगे फार्म, टेंभुर्णी येथे या अभ्यासगटाने भेट दिली. त्यावेळी रनीतम बोलत होते.
‘‘चेन्नई वरुण शेळ्यांचे चमडे प्रोसेसिंग करून वर्गवार करतात. त्यात पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद येथील चमडे सर्वात उत्तम दर्जाचे आहे’’, असे अधोरेखित करुन, ‘‘चेन्नईवरुन निर्यात ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या ठिकाणी होत असते’’, असेही रनीतम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रुपेश खानविलकर, मल्हारी ढेंबरे यांनीही मार्गदर्शन केले.