महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुधोजी महाविद्यालयात ‘दारू नको दूध प्या’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम आयोजित करून आरोग्याविषयीची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमातून दारूचे व्यसन टाळून दुधाचे सेवन करण्याचे आवाहन केले गेले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष ‘व्यसनाला बदनाम करूया’ मोहिमेंतर्गत प्रबोधन करत आहे. या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून 31 डिसेंबरला मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे ‘दारू नको दूध प्या’ उपक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना दारूचे व विविध व्यसनाचे गंभीर परिणाम सांगण्यात आले व दुधाचे वाटप करण्यात आले.

नववर्षाची सुरुवात दारु पिऊन नव्हे तर दुध पिऊन करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुधोजी महाविद्यालय यांच्यामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमात मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, उपप्राचार्य प्रा. ज्ञानदेव देशमुख, प्रा. डॉ. प्रभाकर पवार, प्रा. रणधीर मोरे व इतर शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणचे श्री. आनंद देशमुख, श्री आत्माराम बोराटे, श्री सचिन काकडे, सौ. मंदाकिनी गायकवाड, सौ. मोहिनी भोंगळे सौ. आरती कांबळे यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाने तरुण पिढीला निर्व्यसनी जीवनाच्या महत्त्वाबद्दल प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे समाजात आरोग्याची जाणीव वाढेल आणि व्यसनाचे दुष्परिणाम टाळता येतील.


Back to top button
Don`t copy text!