फलटण आगाराच्यावतीने साडेतीन शक्तीपीठे दर्शन यात्रेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 5 आक्टोंबर 2024 । फलटण । शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराच्यावतीने साडेतीन शक्तीपीठे दर्शन यात्रा सुरु करण्यात आली आहे.

साडेतीन शक्तीपीठे यात्रा ही फलटण येथून निघणार असून औंध, कोल्हापूर, तुळजापूर, माहुरगड, औंढानागनाथ, वणी करुन पुणे मार्गे पुन्हा फलटणला येणार आहे.

सदरील यात्रेमध्ये महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना निम्मे तिकीट असून अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीट माफ आहे. सदरील शक्तीपीठे दर्शनयात्रेचे फुल तिकिट हे 3900 असून हाफ तिकिट 1950 आहे आपल्या परिसराती 42 नागरिकांना ग्रुप जर झाला तर त्या परिसरातून बस सोडण्याची व पुन्हा पोहाच करण्याची सोय फलटण आगाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

तरी सदरील यात्रेसाठी राहुल वाघमोडे-9637212296, सुहास कोरडे- 9527831262, रविंद्र सुर्यंवंशी -9029357810, सुखदेव अहिवळे-9850802480, धीरज अहिवळे-7757886786 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फलटण आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!