पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण


स्थैर्य, जम्मू, दि. 23 : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलंय.  पुलवामा परिसरात बंडजू येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव,येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले आहेत.

आज (दि.२३) पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना या दरम्यान, तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते. ते शहीद झाल्याची माहिती मिळताच पानगाव व आसपासच्या अनेक गावांमध्ये स्वयंस्फुर्तीने ‘बंद’ पाळून शहीद काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!