रेशनकार्डवर एक सदस्य अपात्र ठरल्यास संपूर्ण कुटुंबाचा धान्य पुरवठा बंद करू नका; राज्य अन्न आयोगाचे कडक निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

रेशनकार्डवरील एका सदस्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अन्नसुरक्षेपासून वंचित ठेवू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज्य अन्न आयोगाने राज्य सरकारला केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ नोव्हेंबर : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना एकाच रेशनकार्डवर समाविष्ट असलेल्या कुटुंबातील एखादा सदस्य अपात्र ठरल्यास संपूर्ण कुटुंबाला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाने दिले आहेत. प्रत्येक प्रकरणाची प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा लाभ कायम ठेवावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे एकाच शिधापत्रिकेवर दोन किंवा अधिक स्वतंत्र कुटुंबे वास्तव्यास असतात. कुटुंबातील एखादा सदस्य प्राप्तिकर भरत असल्यास किंवा त्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास संपूर्ण शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे केवळ एका सदस्याच्या आर्थिक निकषांमुळे इतर पात्र सदस्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद करणे अन्यायकारक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

काळजी आणि स्वतंत्र शिधाबटिकेचे विभाजन

राज्यात दुष्काळामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना पात्र नागरिक अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी लाभ बंद केलेल्या प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी करावी. तसेच स्वतंत्र शिधापत्रिकांमध्ये विभाजन करून पात्र नागरिकांचा लाभ तातडीने पूर्ववत करावा, असे निर्देश अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले आहेत.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!