दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणित्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई केली जावी आणि त्यांनी सेबीला दिलेला जबाब गृहीत धरून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी महाराष्ट्र अनिसने द्वारे हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन अनिस मार्फत ह्या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या सीबीआयला तसेच मुंबई चे पोलीस आयुक्त यांना देखील देण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सारख्या देशाच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संस्थे मधील सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने आपले दैनदिन काम पाहण्यासाठी अध्यात्मिक गुरूच्या नावाच्या खाली भोंदू बाबाचा सल्ला घेणे हि शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यान्वये हा गुन्हा देखील आहे. जादूटोणा विरोधी कायद्या नुसार,‘’दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या आधारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे.’’को-लोकेशनघोटाळा प्रकरणी चित्र रामकृष्ण ह्यांनी सेबीला दिलेल्या जबाबात आपण आनंद सुब्रम्हण्यम ह्यांची नेमणूक आणि इतर बाबींच्या मध्ये आपल्या हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होतो असे नमूद केले आहे. आणि ह्या गुरूचा ठावठिकाण विचारला असता त्यांना मानवी देह नाही असे अतींद्रिय शक्तींचा दावा करणरे उत्तर दिले आहे.
प्रत्यक्षात शरीराच्या शिवाय माणसाचे अस्तित्व शक्य नाही, असे असताना लोकांच्या मनात असलेल्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेवून, अतींद्रिय शक्तीच्या नावावर शेअर बाजारा संबंधीनिर्णयघेतानाचित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रम्हण्यम यांनीलोकांची फसवणूक केली आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे. शेअर बाजारातील घोटाळा बाहेर आल्यावर सेबीने केलेल्या चौकशी मध्ये प्रत्यक्षात हि माहिती समोर आली आहे. तसेच ह्या अतींद्रिय शक्तीचा दावा असलेल्या बाबाच्या कडून आलेल्या इमेल देखील आहेत .सेबीच्या अहवालात ह्या गोष्टी स्पष्ट नमूद केल्या आहेत. सेबीने केवळ आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या दृष्टीने चौकशी केली असल्याने त्या मधील भोंदूगिरीच्या दाव्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ह्या प्रकरणाची चौकशी करणारया सीबीआयने ह्या भोंदूगिरीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र अनिस मार्फत करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे मध्यवर्ती कार्यलय मुंबई येथे असल्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेला जादूटोणा विरोधी कायदा ह्या प्रकरणात लागू होतो हे सीबीआय तसेच मुंबाई पोलीस कमिशनर ह्यांना देखील तक्रार अर्जाच्या द्वारे कळवण्यात आले असल्याचे ह्या मध्ये नमूद केले आहे.
अतींद्रिय शक्ती सारख्या कोणताही वौज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींच्या वर केवळ अशिक्षित लोक विश्वास ठेवतात असे नसून सुशिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा गोष्टींच्या वर विश्वास ठेवतात हे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. आपण आपल्या खाजगी आयुष्यात कशावर विश्वास ठेवावा हे प्रत्येकाचा प्रश्न आहे पण देशाच्या दृष्टीने महत्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्वाचे कार्यालयीन निर्णय हे भोंदू बाबांच्या सल्याने घेणे किंवा जनतेच्या धर्मभावनांचा फायदा उठवण्यासाठी एखाद्या बाबांच्या नावाआड आपले कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे हे जनतेची फसवणूक आहे आणि हे लोकांच्या समोर यावे ह्या साठी महाराष्ट्र अनिस ह्या तक्रारीचा पाठपुरावा करणार असल्याचे ह्या मध्ये नमूद केले आहे. अत्यंत उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा भोंदू गिरीला बळी पडतात किंवा त्याच्या मागे लपतात ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अनिस येणाऱ्या काळात सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा ह्या विषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे असल्याचेमहाराष्ट्र अनिस सातारा जिल्हा यांचे मार्फत वंदना माने, दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे, सुकुमार मंडपे प्रमोदिनी मंडपे यांनी सांगितले आहे.