महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२२ सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र   केसरी  कुस्ती स्पर्धा 2021-22 या दि. 4 ते 9 एप्रिल 2022 रोजी पर्यंत सातारा शहरामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथे होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा  पाहण्यासाठी  येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात  गर्दी होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988 कलम 115, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  सातारा शहरातील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल केला आहे.

वाहतुकीकरिता बंदी घालण्यात आलेले मार्ग : दि. 4 ते 9 एप्रिल 2022 रोजी स्पर्धा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जुना आर. टी. ओ. चौक  ते भु-विकास बँक चौक व भु-विकास बँक चौकातून श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल मार्गे  एस. टी. स्टँड इन गेटकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना ( ॲम्बुलन्स, अग्निशामक व पोलीस वाहने वगळता) येण्या –जाण्याकरीता बंद करण्यात येत आहे.

वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग  वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी जुना आर. टी. ओ. चौक – पारंगे चौक- एस. टी. स्टँड इन गेट – भूविकास बँक चौक मार्गे मोळाचा ओढा या ठिकाणी जातील.

वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी जुना आर. टी. ओ. चौक-पारंगे चौक- एस. टी. स्टँड इन गेट – राधिका सिग्नल – राधिका रोड- बुधवार नाका मार्गे मोळाचा ओढा या ठिकाणी जातील.

वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी जुना आर. टी. ओ.  चोक-  पारंगे चौक – पोवई नाका- राजपथ रोड – मोती चोक – राधिका टॉकीज चौक – बुधवार नाका मार्गे – मोळाचा ओढा या  ठिकाणी जातील.

वाहन पार्किंग व्यवस्था

महाराष्ट्र   केसरी कुस्ती स्पेर्धेकरिता येणारे स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यांनी आपली वाहने जिल्हा परिषद मैदान, सभापती निवास (पोवई नाका), तालीम संघ मैदान, शानबाग शाळेचे मैदान, करंजे येथील श्री. दिपक पाटील यांचे मोकळे जागेत व मोळाचा ओढा येथील आय. टी. आय. कॉलेजचे मैदान या ठिकाणी पार्किंग करावीत.

तरी वरील वाहतुकीतील बदलाची  नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. बन्सल यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!