
दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । सातारा । पारंपारिक कुस्ती या क्रीडाप्रकाराला उत्तेजन देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील एक लाख रुपये किमतीची बुलेट देण्याचे जाहीर केले होते. या बुलेटच्या चॉईस साठी पृथ्वीराज पाटील आज येथील बॉम्बे चौकातील बुलेट शोरूममध्ये दुपारी दाखल झाला. क्लासिक 350 रॉयल एनफिल्ड बनावटीचे टॉप मॉडेल त्यांनी पसंत केले. उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यालासुद्धा उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने युनिकॉर्न गाडी भेट देण्यात येणार आहे.
यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सोहळा जितका रंगला त्यापेक्षा बक्षिसाच्या रकमेत करून रंगलेला राजकीय वाद जास्त चर्चेचा ठरला मात्र महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी यांच्यावर बक्षिसांची खैरात झाली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांना एक लाख रुपये किंमतीची बुलेट देण्याचे जाहीर केले. उदयनराजे मित्र समुहाने दिलेल्या शब्दाला जागत तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी केली. मंगळवारी महाराष्ट्र केसरी विजेते पृथ्वीराज पाटील सातार्यात रॉयल इन्फिल्डच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील शोरूम मध्ये दाखल झाले. पर्पल सिल्वर पर्पलची क्लासिक 3:50 टॉप मॉडेल गाडी त्यांनी पसंत केले या गाडीचे वितरण लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांना केले जाणार आहे.
याशिवाय अटीतटीच्या सामन्यात निर्णय क्षणाला काही गुणांच्या फरकाने पराभूत झालेले उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांच्या ही कामगिरीची दखल खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने याच कार्यक्रमामध्ये युनिकॉर्न नावाची गाडी भेट म्हणून दिली जाणार आहे.