स्थैर्य, फलटण : साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे सन २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता महाराष्ट्र सरकारने भारतरत्न पुरस्कारासाठी आण्णाभाऊ साठे यांचे नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी अशी अपेक्षा आ. दिपकराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचेकडे पञाद्वारे केली आहे.
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा यासाठी लहुजी शक्ती सेना फलटण यांनी तालुक्याच्यावतीने आ. दीपक चव्हाण यांना भेटून पत्र दिले असता आ. चव्हाण यांनी लगेचच मुख्यमंत्री यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार शिफारसीसाठी प्रस्ताव तयार करुन तो केंद्राकडे पाठवावा असे विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
साहित्य क्षेत्रात, साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नाव आदराने घेतले जाते. साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना भारतरत्न पुरस्कार देणेत यावा अशी शिफारस आपण केंद्र सरकारला करावी. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन तो केंद्राकडे पाठवावा अशी विनंती आ. दिपक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे सन २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकारने या वर्षाच्या निमित्ताने द्यावा अशी लहुजी शक्ती सेना आणि फलटण तालुका व महाराष्ट्र राज्यातील समस्त बांधवांची अपेक्षा असून भारतरत्न पुरस्कारासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे लहुजी शक्ती सेना फलटण तालुकाध्यक्ष विजय (नाना) घोलप यांनी सांगितले.
आ. दीपक चव्हाण यांना विनंती करण्यासाठी लहुजी शक्ती सेना फलटण तालुकाध्यक्ष विजय घोलप, उपाध्यक्ष विजय गायकवाड, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा (पश्चिम विभाग) इंदुमती कानिफ घोलप, युवा आघाडी तालुकाध्यक्ष बिपिन बागाव, सचिव महादेव बागाव, संपर्क प्रमुख धनाजी यादव, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर घोलप, विनोद लोखंडे, सोनू इंगळे, कुमार रिटे, बाळू रिटे, सत्यवान अडागळे, दादा ढवळे, गणेश आवळे, दादा घोलप, किरण (भैय्याजी) घोलप, बबन घोलप, पवन (दादा) तुपे, सागर बाबर, प्रमोद घोलप, आकाश बागाव यांचेसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.